अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:09 PM2018-07-02T23:09:12+5:302018-07-02T23:09:31+5:30
राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही पसरविण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही पसरविण्यात येत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. पोलिसांच्या संपर्कात रहा, असे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने या संदर्भात सोमवारी एक निवेदन जारी केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नजीकच्या पोलीस ठाण्यात चौकशी करावी, माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
केवळ संशयावरून कायदा हातात घेणे आणि निष्पाप व्यक्तींचा छळ करणे हा गुन्हा आहे. राज्यात काही ठिकाणी संशयावरून हिंसक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे घडू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आल्याचे ठाकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकांनीही तथ्यहीन घटनांवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून येवून जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत संवेदनशिल राहावे व कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित चंद्रपूर पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधावा.
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर जिल्हयातील सायबर सेल सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असून अशा प्रकारच्या अफवा पसरवणाºयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जारी केलेल्या पत्रकातून दिले आहेत.