खाण बंद न करता अन्य पर्यायांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:25 PM2018-04-08T23:25:59+5:302018-04-08T23:25:59+5:30

हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि व्यवस्थापनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

Do not close the mine, search for other options | खाण बंद न करता अन्य पर्यायांचा शोध घ्या

खाण बंद न करता अन्य पर्यायांचा शोध घ्या

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : लालपेठ खुल्या कोळसा खाणीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि व्यवस्थापनाच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. मात्र ही खाण बंद न करता वेकोलि व्यवस्थापनाने अन्य पर्यायाचा अवलंब करून तसेच पाचही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील कामगार याच ठिकाणी कार्यरत राहतील, अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिल्या.
हिंदूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाण संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाची दखल घेत त्यांनी या खाणीला भेट देवून उपस्थित वेकोलि अधिकाºयांशी चर्चा केली. जोपर्यंत स्टेज १ व २ चा मार्ग मोकळा होणार नाही, तोपर्यंत कोळसा उत्खनन बंद राहील, अशी भुमिका अधिकाऱ्यांनी घेत खाणीत कार्यरत ४५० कामगारांपैकी २०० कामगारांना इतरत्रा हलविण्याची कार्यवाही वेकोलि व्यवस्थापनाकडून सुरू झाली असल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. यात हस्तक्षेप करण्याची मागणी वेकोलि कामगार व कामगार संघटनांच्या पदाधिकाºयांनी ना. अहीर यांच्याकडे केली होती. त्यानुसार ना. अहीर यांनी प्रत्यक्ष ओपनकास्टला भेट दिली.
याप्रसंगी क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुल सराफ, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजपा किसान आघाडी महामंत्री राजू घरोटे, उपक्षेत्रिय प्रबंधक ए. सी. हलदर, खाण प्रबंधक एन. के. मुंजेवार, युनियनचे पदाधिकारी बी. जी. दाभाडे, अभय तिवारी, भारतीय मजदूर संघाचे विजय आक्केवार, आयटकचे दिलीप बर्गी, संजय कांबळे, सीटूचे विठ्ठल कडू, सैय्यद, एचएमएसचे व्यंकटेश सुरा व पुरूषोत्तम गोंगले यांच्यासह खाण कामगार बहुसंख्यने उपस्थित होते.

Web Title: Do not close the mine, search for other options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.