महाऔष्णिक केंद्रात गुरे सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:20 PM2018-11-14T22:20:45+5:302018-11-14T22:21:02+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, मीनगाव, आगरझरी, म्हसाळा, तुकूम आदी गावातील सरपंचांना त्यांच्या अधिनस्थ परिसरातील पाळीव व मोकाट जनावरे आपल्या ताब्यात घेण्याकरिता प्रशासनातर्फे पत्र देण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक गावामध्ये दवंडी पिटविण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्लांट, एडीपीएल आणि वसाहत परिसरात पट्टेदार वाघीण तिच्या तीन शावकासह आणि इतर हिंसक प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. हा परिसर जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो.
सदर परिसरात असलेल्या पाळीव व मोकाट जनावरांचा वावर हिंसक प्राण्यांना निमंत्रण देण्यासारखा ठरू शकते. त्यामुळे ही जनावरे कोणत्याही परिस्थितीत विद्युत केंद्रातील वसाहतीबाहेर काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सांगण्यात आले होते.
पाळीव व मोकाट जनावरे जिल्हाधिकाºयांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका चंद्रपूर यांच्यातर्फे विद्युत केंद्र व वसाहतीच्या बाहेर काढण्यात येणार आहे. जंगलाला लागून असणाºया परिसरात जनावरे असल्यास वन्य प्राण्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील विद्युत केंद्राच्या लगत असलेल्या अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, किटाळी, मीनगाव, आगरझरी, म्हासाळा, तुकूम आदी गावांतील सरपंचांनी पशुपालक शेतकºयांना माहिती देऊन ही जनावरे केंद्र परिसरात आणण्यास मज्जाव करण्याचे सीटीपीएसतर्फे कळविण्यात आले.