औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:20 PM2018-03-24T23:20:49+5:302018-03-24T23:20:49+5:30
४७ व्या औद्योगिक सुरक्षा कायम राहिली तरच उत्पादन वाढेल, असे मत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ४७ व्या औद्योगिक सुरक्षा कायम राहिली तरच उत्पादन वाढेल, असे मत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य अभियंता अनिल आष्टीकर, राजू घुगे, अधीक्षक अभियंता सुहास जाधव, उपमुख्य अभियंता (प्रभारी) विजया बोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा सप्ताह या विषयावर आधारीत घोषवाक्य, भिंतीचित्र, कविता, पेपर प्रेझेंटेशन व रांगोळी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत निरीक्षक प्रदीप चामट उपस्थित होते.
चामट म्हणाले, प्रत्येक कामातील धोके ओळखून, कामाचे नियोजन केले पाहिजे. औष्णिक केंद्रात सर्व प्रकारची आधुनिक सुरक्षा सामग्री आहे. कामगारांची क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षणही आयोजित केले जातात. त्यामुळे केंद्रामध्ये अपघाताच्या घटना घडल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्य अभियंता अनिल आष्टीकर, राजू घुगे, अधीक्षक अभियंता सुहास जाधव, उपमुख्य अभियंता (प्रभारी) विजया बोरकर, उपमुख्य अभियंता (प्रशासन) मधुकर परचाके यांनी सुरक्षितता विषयक नियमांची अंमलबजावणी आणि कर्तव्य विषयाची मांडणी केली. शुन्य अपघात पातळी गाठावे, असेही यावेळी सांगण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पुरस्कृत करून गौरविण्यात आले.
हा उपक्रम केंद्रात दरवर्षी घेतला जातो. कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षेचे धडे दिले जातात. यातून कर्मचाºयांचा आत्मविश्वास वाढतो, अशी भूमिका प्रास्ताविक भाषणातून मुख्य सुरक्षितता अधिकारी श्रावण चव्हाण यांनी मांडली. संचालन सुरक्षितता अधिकारी प्रशांत कठाळे यांनी केले. आभार प्रशांत सोनोने यांनी मानले. यावेळी औष्णिक केंद्रातील मोरेश्वर मडावी, विष्णू पगारे, कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.