प्लास्टिकबंद वस्तूंवर कारवाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:47 PM2018-06-27T22:47:50+5:302018-06-27T22:48:28+5:30
शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिले.
ना. मुनगंटीवार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले असताना चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने स्थानिक विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीमुळे व्यवसायात येत असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्लास्टिक बंदीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत मनपा प्रशासनाने प्लास्टिक बंद वस्तूंवर कारवाई करू नये, वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकचा वापर होत असेल तर कारवाई करावी, असे आयुक्तांना निर्देश दिले. त्यामुळे व्यापाºयांना दिलासा मिळाला आहे.
या शिष्टमंडळात चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामजीवन परमार, रामकिशोर सारडा, प्रभाकर मंत्री, संतोष चिल्लूरवार, गोविंद सारडा, नारायण तोष्णीवाल, व्यंकटेश उपगन्लावार, नरेश दुधानी, प्रवीण उपगन्लावार, राजीव उपगन्लावार, राकेश टहलियानी आदी उपस्थित होते.