उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:31+5:302021-04-08T04:28:31+5:30
कोरपना : उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपनाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात ...
कोरपना : उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपनाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंगळवारी कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाईची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील ११९ गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना नियमाचे पालन करून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अडचणी आमदारांनी जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सन २०२०-२०२१ या वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी चंद्रकला मोतीराम तोडासे रा. कोठोडा बु. तसेच सविता मंगेश तिखट रा. निमनी यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जि.प. सदस्या कल्पना पेचे, विना मालेकर, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, माजी सभापती श्याम रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उत्तम पेचे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नायब तहसीलदार चिडे, सहायक उपअभियंता दराडे, सहअभियंता विद्युत विभाग इंदूरकर, कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
खासगी विहिरी किंवा बोरवेल अधिग्रहित करण्यात याव्या व यासंदर्भात प्रस्ताव तहसीलदार कोरपना यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना दिल्या आहेत.