जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

By admin | Published: January 7, 2016 01:26 AM2016-01-07T01:26:08+5:302016-01-07T01:26:08+5:30

जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, ...

Do water works on shovel and pond | जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

Next

अधिकाऱ्यांना निर्देश : हंसराज अहीर यांनी घेतला योजनांचा आढावा
चंद्रपूर : जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, नाल्यांचे खोलीकरण प्रधानमंत्री कृषी योजना, खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रस्तावित कामे व या कामांची सद्यास्थिती तसेच राज्य व केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या विकास कामांचा आढावा केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विविध खात्याच्या विभाग प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीत घेतला. ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गाडेगोणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संतान यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होेते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा प्रगती विषय आढावा खाते प्रमुखांकडून जाणून घेतला. जिल्ह्यात सिंचन सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने जलयुक्त शिवाराची कार्यकक्षा वाढवून ही योजना कार्यक्षमपणे सिंचन अभाव असलेल्या क्षेत्रामध्ये राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले. ज्या भागात जलयुक्त शिवाराची कामे झालेली आहेत. तेथील वॉटर टेबलची तपासणी करण्यास प्राधान्य द्यावे, केंद्र शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संयुक्तपणे राबविणार असल्याचे सांगितले.रस्त्यांलगतच्या सर्व गावांमध्ये भाजीपाला, फळ लागवट उत्पादनात प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न कृषी विभागाने करावे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाजीपाला क्लस्टर संबंधात पर्याय शोधण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नाला खोलीकरण, माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे या कामांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, सिमेंट नाला बंधाऱ्यांची जास्तीत जास्त कामे हाती घेण्यात यावे, अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Do water works on shovel and pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.