सिंचन विहिरीचे काम मग्रारोहयोमधून करा
By admin | Published: May 23, 2014 11:45 PM2014-05-23T23:45:08+5:302014-05-23T23:45:08+5:30
शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी
चंद्रपूर: शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योजनेंअंतर्गत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केली आहे. विदर्भात शेतकर्यांची स्थिती चिंताजनक असून नापिकीमुळे शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत आला आहे. शेतात येत्या हंगामात पेरणी ते कापणीपर्यंतची कामे करण्याकरिता हातात पैसा नाही. नापिकीमुळे मागील कर्ज फेडता न आल्याने पुढील कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय मार्ग उरला नाही. यावर उपाय म्हणून येत्या शेती हंंगामात शेतकर्याच्या शेतावर रोपांची पेरणी पासून ते कापणीपर्यंतची कामे हे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. ज्या शेतकर्यांनी स्वकमाईतून शेतात सिंचन विहिर खोदकाम केले. परंतु पैशाअभावी अपुर्ण अवस्थेत आहेत अशा शेतकर्यांना १.५ लाख पर्यंत मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वेळा मजूर मिळत नसल्याने शेतात पेरणी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रोहयोंतर्गत कामे केल्यास शेतकर्यांच्या हिताची तसेच आर्थिक मदत करणारी ठरले. असेही पाझारे यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रधान सचिव (रोहयो) व्ही. गिरीराज यांच्याकडे निवेदन दिले आहे. (नगर प्रतिनिधी)