पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:25+5:302021-09-19T04:28:25+5:30
यावर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली. जिल्ह्यातील पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाची सुविधा असलेले शासकीय एक आणि खासगी ११ ...
यावर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली. जिल्ह्यातील पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाची सुविधा असलेले शासकीय एक आणि खासगी ११ काॅलेज आहेत. शासकीय नोकरीच्या संधी कमी होत असल्याने तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे शिकल्यानंतर रोजगार मिळावा, यासाठी विद्यार्थी आता पाॅलिटेक्निककडे वळले आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाॅलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत आहेत. पहिल्या फेरीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत विकल्प अर्ज भरून प्रवेश निश्चित करायचा होता. त्यानंतर आता जागा वाटप होणार असून, १९ ते २३ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. दहावीचा निकाल जास्त प्रमाणात लागल्यामुळे यावर्षी पाॅलिटेक्निकसाठीही स्पर्धा निर्माण झाली आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
एकूण पाॅलिटेक्निक महाविद्यालये-१२
एकूण प्रवेशक्षमता ३,५४०
शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालये १
शासकीय पाॅलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता ३९०
खासगी पाॅलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता २,७६०
बाॅक्स
सिव्हिल, संगणकाकडे विद्यार्थ्यांचा ओढा
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा सिव्हिल तसेच इलेक्ट्रिकल, संगणक अभ्यासक्रमाकडे आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी या क्षेत्राकडे वळत आहेत.
कोट
प्राचार्य म्हणतात.
पाॅलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पाॅलिटेक्निककडे वाढला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षी जागा पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे.
-डाॅ. अनिल पावडे
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी