‘विनू’ तुला भरोसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:50 PM2017-11-18T23:50:51+5:302017-11-18T23:51:59+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही.

Do you trust 'Vinoo'? | ‘विनू’ तुला भरोसा नाय काय?

‘विनू’ तुला भरोसा नाय काय?

Next
ठळक मुद्देशिक्षकांच्या मोर्चात घोषणा : प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश रस्त्यावर

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही. या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज अन्यायकारक शासन निर्णय निघत आहेत. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या मनात खदखदत असलेला हा असंतोष शनिवारी आक्रोश मोर्चाच्या रुपात व्यक्त झाला. यावेळी प्राथमिक शिक्षकांसोबत शिक्षिकांनी ‘विनू’ तुला भरोसा नाय का?, अशी घोषणा देत शिक्षणमंत्र्यांना टोला हाणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळेतील शिक्षक हजारोच्या संख्येत मोर्चात सहभागी झाले. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आर.जी.भानारकर, नारायण कांबळे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, दीपक वर्हेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना व मुख्याध्यापक संघटनेने आपला पाठींबा जाहीर केला होता व सक्रीय सहभाग नोंदवला. सदर संघटनेकडून दुष्यंत निमकर, निलेश कुमरे, सुनील दुधे, मनीषा मडावी, मोरेश्वर बोंडे, सुरेश वासेकर यांनी सहभाग नोंदवला.
नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत २३ आॅक्टोंबर २०१८ च्या अन्यायकारक शासन निर्णयातील अट क्र. ४ रद्द करणे, भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे तसेच ते खरेदीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीला देणे व विद्यार्थी उपस्थिती भत्यात वाढ करणे, शिक्षकांकडील आॅनलाईनची सर्व कामे बंद करणे व व्हॉटसअपवर आदेश देणे बंद करणे, एम.एस.सी.आय.टी. साठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे, शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करणे, समान काम समान वेतन, या न्यायाने सर्व विषय शिक्षकांना पदवीधर पदाची वेतनश्रेणी लागू करणे, शिक्षण सेवकांना तीन वेतनवाढी मंजूर करणे तथा अप्रशिक्षित व वसतिशाळा शिक्षकांना रुजू तारखेपासून वरिष्ठ वेतनासह सर्व लाभास पात्र ठरविणे, सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करणे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी किशोर आनंदवार, अशोक दहेलकर, रवी वरखेडे, दिलीप इटनकर, हेमंत वागदरकर, पी. टी. राठोड, सुरेश मस्के, किशोर भोयर, सुभाष अडवे, आर. टी. चौधरी, प्रभाकर भालतडक, अनिल नैताम, बाबुराव पहानपटे, रामेश्वर सेलोटे, इंदिरा पहानपटे, प्रतिभा उदापुरे, मिनाक्षी बावनकर, निखील तांबोळी, केवलराम मैंद, सुधाकर कोल्हे, नरेंद्र मुंगले, गोविंद गोहणे, पंकज तांबडे, गणेश आसेकर, निरंजन गजबे, विजय कुंभारे, सुनील वैद्य, राजेंद्र घोरुडे, विपिन धाबेकर, किशोर नरड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Do you trust 'Vinoo'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.