डॉक्टर करणार काम बंद आंदोलन
By admin | Published: May 24, 2014 11:28 PM2014-05-24T23:28:39+5:302014-05-24T23:28:39+5:30
शासनाने आश्वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद
पत्रकार परिषद : मागण्यांची पूर्तता करण्याची मॅग्मो संघटनेची मागणी चंद्रपूर : शासनाने आश्वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यात जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयातील सुमारे २00 ते २५0 वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश नगराळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करणार्या वैद्यकीय अधिकार्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळेच वैद्यकीय अधिकार्यांच्या समस्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच आरोग्य विभागाकडे सेवा देण्यासाठी नवीन डॉक्टरांमध्ये निरूत्साह दिसून येतो. मागील ३ वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांना निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. संबंधितांकडून मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्या गेले. परंतु अद्याप मागण्या पूर्णत्वास आल्या नसल्याचेही ते म्हणाले. वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही तर, २७ मे पासून असहकार, तर २ जूनपासून काम बंद आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अँलोपॅथी दवाखान्यातील सुमारे २00 ते २५0 वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ढेपाळल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही डॉ. नगराळे यांनी सांगितले. २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्ष लाभ मिळावा. ७८९ बीएएमएस व ३२ बीडीएस या अस्थायी कर्मचार्यांची सेवा समावेशन करण्यात यावे, २00६ पासून ६ व्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. संदीप गेडाम, डॉ. आनंद किन्नाके, डॉ. उत्तम पाटील, डॉ. मेश्राम, डॉ. सुहास इंगळे, डॉ. किशोर भट्टाचार्य आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)