कोरोना संकटात डॉक्टरांचे योगदान मोलाचे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:40+5:302021-02-17T04:34:40+5:30
अरुण धोटे : रोग निदान शिबिर राजुरा : कोरोनासारख्या महामारी संकटात समाजाला आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केलेले आहे. ...
अरुण धोटे : रोग निदान शिबिर
राजुरा : कोरोनासारख्या महामारी संकटात समाजाला आधार देण्याचे काम डॉक्टरांनी केलेले आहे. राजुरा सारख्या ठिकाणी गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळावी म्हणून डॉक्टर स्वप्नील चिल्लावार यांनी निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.
चिल्लावार हॉस्पिटल राजुराच्या वतीने नुकतेच तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत रोगनिदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पार पडले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना अरुण धोटे बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विनायक चिलावर, संध्या चिलावार, डॉक्टर स्वप्नील चिल्लावार, समीर चिल्लावार, मयुरी चिल्लावार, नेहा चिल्लावार यांची उपस्थिती होती. चिल्लावार हॉस्पिटल तर्फे नगराध्यक्ष अरुण धोटे व उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना संकटात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उमाकांत धोटे, चरणदास नगराळे, प्राध्यापक बी.यु.बोर्डेवार,एजाज अहमद, सुरेश साळवे, गणेश बेले, एम के. सेलोटे,
आनंद चलाख, फारुक शेख ,श्रीकृष्ण गोरे, अनंत गोखरे उपस्थित होते.
आरोग्य शिबिराचा तालुक्यातील जवळपास ५०० रुग्णांना लाभ घेतला. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, बोंड डेन्सिटी, थायराइड, न्यूरोपैथी पल्मनरी फंक्शन यांची तपासणी करण्यात आली. संचालन मंजुषा भास्करवार यांनी केले तर आभार समीर चिल्लावार यांनी मानले.