आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांनी तत्पर असावे
By Admin | Published: March 26, 2017 12:34 AM2017-03-26T00:34:51+5:302017-03-26T00:34:51+5:30
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यास तत्पर असावे.
वैशाली बुध्दलवार यांचे प्रतिपादन : कोठारी येथे आरोग्य शिबिर
कोठारी : डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यास तत्पर असावे. तसेच नागरिकांना आरोग्य तपासणी करून औषधोपचार देण्यास टाळाटाळ करू नये. नागरिकांच्या आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येण्याचा ईशारा जि.प.सदस्य वैशाली बुध्दलवार यांनी दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारीद्वारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
शिबिराचे उद्घाटन पं.स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मो. शारिक इकबाल, डॉ. श्वेता वानखेडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करून औषधांचे वितरण केले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ एम.बी. मुरकुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती गोलपेल्लीकर, लभाणे, पाटील, आदींनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
अनुपस्थितांवर कारवाई करण्याचे संकेत
कोठारीत आयोजीत एक दिवसीय रोगनिदान शिबिरात जि.आ. अधिकारी गोगुलवार, उपसभापती इंदिरा पिपरे, सरपंच गोपिका बुटले, सं.वि. अधिकारी वर्ग-बी गजभे, बा.वि.प्र. अधिकारी वंदना दुधाने, गटशिक्षणाधिकारी थेरे आदींना निमंत्रीत केले होते. मात्र सर्व अधिकारी उपस्थित न झाल्याने जि.प. सस्या वैशाली बुध्दलवार यांनी नाराजी व्यक्त करून संबंधिताबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले.