कोणी लस देता का लस? खासगी व सरकारी रुग्णालयातही लसीचा दुष्काळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:57+5:302021-07-24T04:17:57+5:30
कोरोनावर अद्याप कोणतेही औषध निघाले नाही. कोरोना प्रतिबंधक म्हणून लसीकरणाकडे बघितले जात आहे. राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात ...
कोरोनावर अद्याप कोणतेही औषध निघाले नाही. कोरोना प्रतिबंधक म्हणून लसीकरणाकडे बघितले जात आहे. राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात ४१० शासकीय लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रावर मोफत लस देण्यात येत आहे. तर ६ खासगी केंद्रांवर विकत लस देण्यात येत आहे. परंतु, लसीकरण केंद्राला पाहिजे त्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने एक दिवसाआड या केंद्रावरील लसीचा साठा संपतो. त्यामुळे केंद्राबाहेर लसीकरण बंद असल्याचे बोर्ड दिसून येतात; तर खासगी केंद्रावरील डाॅक्टरांना लसीकरणासाठी विविध जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून खासगी डॉक्टरांकडेसुद्धा लससाठाच नाही. त्यामुळे अनेकजण लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कुणी लस देता का लस असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बॉक्स
शासकीय रुग्णालयात केवळ १२,०००
खासगी रुग्णालयामध्ये ....................
१) शुक्रवारी जिल्ह्यातील ज्या केंद्रावर लस उपलब्ध होती. तेथे लसीकरण करण्यात आले; परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील शासकीय लसीकरण केंद्रासाठी १२ हजार लसीचा पुरवठा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
२) खासगी केंद्रावरील लसीकरण बंद आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे डॉक्टरांकडून लसीची मागणी बंद आहे.
बॉक्स
हेच का मोफत लसीकरण?
मागील काही दिवसांपासून शासकीय आयटीआय येथील लसीकरण बंद असल्याचा फलक लावून आहे. त्यामुळे दररोज जावून परत यावे लागत आहे. शासनाने लसीचा मुबलक साठा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
-अनिल रायपुरे, चंद्रपूर
-----
मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर जाऊन गेल्यापावली परत येत आहे. ऑनलाईन रजिस्टेशनसुद्धा बंद आहे. याउलट नगरसेवक आपल्या नात्यातील किंवा आपल्या ओळखींच्या व्यक्तीचे लसीकरण करुन देत आहे.
योगेश वैद्य, चंद्रपूर
------
मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने अडचणीचे जात आहे. ज्या प्रमाणात लस येत आहे. त्या प्रमाणात संबंधित केंद्रावर वितरित करण्यात येत आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने सर्वांनी न चुकता लस घ्यावी.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक
------
बॉक्स
१८ ते ४५ वयोगट
पहिला डोस १२०७९२
दुसरा डोस ९३२६
४६ ते ५९ वयोगट
पहिला डोस १६५८३१
दुसरा डोस ३६९४०
६० पेक्षा जास्त
पहिला डोस १३१०१५
दुसरा डोस ४२३५३