कुणी घर भाड्याने घेतंय का घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:13+5:302021-05-30T04:23:13+5:30
चंद्रपूर शहरातील आंबेडकर कॉलेज, मित्रनगर, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट, हरिओमनगर, पठाणपुरा आदी परिसरात रुम भाड्याने घेऊन राहणाऱ्याची संख्या मोठ्या ...
चंद्रपूर शहरातील आंबेडकर कॉलेज, मित्रनगर, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट, हरिओमनगर, पठाणपुरा आदी परिसरात रुम भाड्याने घेऊन राहणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार याच परिसरात आढळून येतात. मागील वर्षी लॉकडाऊन झाले. तेव्हापासून अद्यापही महाविद्यालये, शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यातच कामगार कपात तसेच कोरोनाच्या दहशतीने अनेकजण गावाकडे परतले. त्यामुळे अनेकांच्या रुम खाली दिसून येतात. तर काहींनी स्वत:चे घर बांधून किंवा खरेदी करून राहायला गेल्यामुळेही घरगुती रुमही खाली दिसून येत आहे.
बॉक्स
घरभाडेही केले कमी
चंद्रपुरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील भाड्याचा खोल्याला मोठी मागणी असायची. मात्र मागील वर्षींपासून कोरोना असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यासोबतच स्पर्धा परीक्षेचे वर्गही बंद आहेत. परिणामी विद्यार्थी गावाकडे गेले आहेत तर मजूरसुद्धा गावाकडे गेले आहेत. रुम खाली असल्याने घरमालकांनी भाडेही कमी केले आहे. मात्र किरायेदार मिळणे कठीण झाले आहे.