सार्वजनिक मंडळांना गोळा करता येणार देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:01+5:302021-08-27T04:31:01+5:30

दिलासा : तात्पुरत्या स्वरूपात उत्सव करता येईल साजरा चंद्रपूर : महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ क ...

Donations can be collected by public circles | सार्वजनिक मंडळांना गोळा करता येणार देणगी

सार्वजनिक मंडळांना गोळा करता येणार देणगी

Next

दिलासा : तात्पुरत्या स्वरूपात उत्सव करता येईल साजरा

चंद्रपूर : महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ क अन्वये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे गणेशोत्सव, दुर्गा व शारदा उत्सवांसाठी दान देणगी गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात उत्सव साजरा करण्यासाठी अर्जदार मंडळांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. याबाबत धर्मदाय संघटनेच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज ऑनलाइन भरताना सर्व दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेले आवश्यक सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील, असे साहाय्यक धर्मदाय आयुक्त सी. एम. ढबाले यांनी कळविले आहे.

बाॅक्स

या आहे अटी

अर्ज परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे. मूळ ठरावाची सर्व सभासदांची स्वाक्षरी असलेली प्रत असणे आवश्यक, संबंधित महानगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत यांचे जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, विद्युत बिलाची झेरॉक्स प्रत, सर्व सभासदांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मागील वर्षाची परवानगीची प्रत, रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, तसेच मागील वर्षाचा हिशेब देणे आवश्यक, मंडळाचे मागील वर्षाचे उत्पन्न रुपये पाच हजारांपेक्षा जास्त असल्यास अंकेक्षण अहवाल अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

Web Title: Donations can be collected by public circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.