शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:27 AM2017-09-18T00:27:29+5:302017-09-18T00:27:41+5:30

शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे.

Done online for scholarship | शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

Next
ठळक मुद्देआधार लिंकची डोकेदुखी : अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार

राकेश बोरकुंडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. आधार लिंकच्या अटीमुळे सेतू केंद्र किंवा सायबर कॅफे चालकही विद्यार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत.
सध्या बहुतेक सायबर कॅफेवर शेतकºयाची गर्दी दिसून येत असून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागल्या आहेत. यातच शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांचीही गर्दी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुंटुबातील आहेत. त्यामुळे एकाच वेळी आई-वडील कर्जमाफीच्या अर्जासाठी दोघेही आवश्यक असल्याने मुंलाना या केंद्रावर जावे लागत असल्याचे दिसते. शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यात सर्वात मोठी अडचण मोबाईल क्रमांक व आधार लिकची येत आहे. ही अट यापूर्वी नव्हती. त्यामुळे कोणत्याही आॅनलाईन यंत्रेणचा आधार घेवून विद्यार्थी आपल अर्ज दाखल करू शकत होता.
परंतु, यावेळी पोर्टल बदल्याने शासनाने ही नवी अट लागू केल्याचे समाजकल्याण विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक लिंक झाल्यानंतरच विद्यार्थ्याची लॉगीन आयडी उघडली जाते. त्यातही पुर्वीप्रमाणे मॅहाईसकॉल सारखे महाडीबीटी हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.
सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या चकरा
सीमकार्ड विकणाºया कंपन्यांना शासनाने आयडी अर्निवार्य केले आहे. परिणामी विविध दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना बोलावून त्यांचा आधार क्रमांक घेवून बोटाचे ठसे नोंदवीत आहेत. विशिष्ट डिव्हाइस वापरून केल्या जाणाºया या कृतीमुळे आपसुकच आपला मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जातो. मात्र ही लिंक शिष्यवृतीचा अर्ज भरताना उपयोगी पडत नाही. त्यासाठी सेतू केंद्रावर जावून आधारच्या संकेतस्थळावरच मोबाईल क्रमांक जोडवा लागतो. या गुंतागुंतीमुळे अनेकांना दररोज सेतुकेंद्रावर चकरा माराव्या लागत आहे. एवढी पायपीट करूनही विद्यार्थ्यांची निराशा होत आहे.

Web Title: Done online for scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.