धानाच्या चुकाºयांना विलंब करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:44+5:302020-12-29T04:27:44+5:30
चंद्रपूर : शेतीतील धान मळणी झाल्यानंतर धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले. आधारभूत खरेदी ...
चंद्रपूर : शेतीतील धान मळणी झाल्यानंतर धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले. आधारभूत खरेदी केंद्रातील खरेदी व्यवस्थित सुरू राहावी, यासाठी
बारदाना पुरवठा व चुकारे तातडीने देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी झाल्यानंतर धान साठवण करण्यासाठी फेडरेशनकडे बारदान्याचा अभाव आहे. व्यापाºयांकडून लूट होऊ नये, यासाठी शेतकरी आधारभूत धान्य खरेदी केंद्रालाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या केंद्रात धान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. आधारभूत धान खरेदी केंद्रात मागील काही दिवसांपासून बारदान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शेतकºयांकडून धान खरेदी केल्यानंतर ठेवायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. यंदा बºयाच शेतकºयांना समाधानकारक उत्पादन झाले. ते आता धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रात येत आहे. खुल्या बाजारात शेतकºयांकडून मनमानी दराने धान खरेदी करण्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे या परिसरातील बहुतांश शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रातच धान विक्री करण्यासाठी येत आहेत. परंतु बारदाना नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी धान खरेदी केंद्रात बारदाना पुरविण्यासाठी तातडीने पाऊल उचलने गरजेचे आहे. भातशेती करणाºया शेतकºयांनी कर्ज काढले. कर्जाचा भरणा करण्यासाठी आता पैशाची गरज आहे. धान विक्री लवकर झाल्यास चुकारे मिळतील अन्यथा उशिर होईल. रब्बी हंगामावर याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. ही कोंडी दूर करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.