पाणी पिताय ना, मग काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:27+5:302021-09-08T04:34:27+5:30
दूषित पाण्यापासून सुमारे पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, ...
दूषित पाण्यापासून सुमारे पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रुग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने अखेर रुग्णाला सलाइन लावण्याची वेळ येते. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या उलटी व जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत.
बॉक्स
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन दिवसांत खूप जुलाब सुरू होतात. पोटात खूप दुखते. कळा येतात. तीन ते चार दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. त्यामुळे अनेकदा ॲन्टीबायोटिक्स देऊन रुग्णाला बरे केले जाते.
बॉक्स
आजाराची लक्षणे
दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. त्याशिवाय चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणे कायम राहतात. ९० ते ९५ टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.
बॉक्स
आजार टाळण्यासाठी काय करावे
पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पाणी उकळून प्यावे. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणं टाळावे. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या व जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर-पाणी सतत पित राहावे. त्यामुळे शरीराला आराम मिळू शकतो.
कोट
मेडिकल स्टोअर्समध्ये ओआरएस पावडर मिळते. ती एक लीटर पाण्यात टाकून प्यावी. टेट्रा पॅक्सदेखील उपलब्ध आहेत ते प्यावे. नारळाचे पाणी घ्यावे. मात्र, ग्लुकॉन डी अथवा कोल्ड्रिंक्स घेणे या दिवसात टाळावे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करावी.
-डॉ. व्ही. एस. नगराळे, आजारतज्ज्ञ, चंद्रपूर.