बर्ड फ्लूूबाबत अफवांना बळी पडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:17+5:302021-01-21T04:26:17+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत भद्रावती तालुक्याच्या पिरली येथील कुक्कुट पक्षामंधील दोन मृत पक्षी व राजुरा तालुक्याच्या बैलमपूर येथील चार ...

Don't fall prey to rumors about bird flu | बर्ड फ्लूूबाबत अफवांना बळी पडू नये

बर्ड फ्लूूबाबत अफवांना बळी पडू नये

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत भद्रावती तालुक्याच्या पिरली येथील कुक्कुट पक्षामंधील दोन मृत पक्षी व राजुरा तालुक्याच्या बैलमपूर येथील चार मृत पक्षी रोग निदानाकरिता पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. पिरल येथील दोन पक्ष्यांचा अहवाल नकारार्थी असून बैलमपूर येथील अहवाल प्रतीक्षेत आहे. मात्र मानोरा ता.बल्लारपूर येथील मृत तीन कावळ्यापैकी एक कावळा पुणे येथे होकारार्थी आढळला असला तरी भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग अन्वेषण संस्थान येथून याबाबत अहवालाची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लूू संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

बर्ड फ्लूू रोगाचा प्रादुर्भाव भारतात काही राज्यात व महाराष्ट्रात काही ठिकाणी आढळून आलेला असल्याने अंडी व पोल्ट्री मांसाकडे खवय्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी सर्व राज्यांना पत्र जारी करून अंडी व मांस यांचे सेवन मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

प्रत्येक तालुक्यात पक्ष्यांमध्ये होणाऱ्या असाधारण मर्तुकीकडे लक्ष ठेवून त्याबाबत अहवाल घेतल्या जात आहे. कावळे, पोपट, बगळे व सर्व स्थलांतरित पक्ष्यांच्या असाधारण मर्तुकीवर पशुसंवर्धन विभागासोबतच वनविभाग, सिंचाई विभाग त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवल्या जात आहे. ब्लिचींग पावडर वापरून प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोल्ट्री शेडचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी २ टक्के सोडियम हायपोक्लोराईड पंचायत व आरोग्य विभागाद्वारे सर्व तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

बर्ड फ्लूू रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्व कुक्कुट व्यावसायिक, किरकोळ व घाऊक विक्रेते, कुक्कुटपालक व केंद्रचालक व परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या जीवाणु व विषाणुंना नष्ट करण्याकरिता धुण्याचा सोडा, एनए१सीओ ३ सोडियम कार्बोनेट यांचे एक लिटर पाण्यांमध्ये ७ ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करून कोंबड्यांचे रिकामे खुराडे, रिकामे पोल्ट्री शेड, खाद्याच्या खोल्या, पोल्ट्री फॉर्मचा परिसर, कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांचा वावर असणाऱ्या परिसरात फवारणी करावी. परत दर सात दिवसांनी फवारणी करावी. अशा प्रकारे आपल्या विविध पक्ष्यांचा बचाव करण्यास मदत होईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अे.एन. सोमनाथे यांनी कळविले आहे.

Web Title: Don't fall prey to rumors about bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.