अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका, क्षणात बँक खाते होऊ शकते साफ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:06+5:302021-08-20T04:32:06+5:30
चंद्रपूर : माझ्या मोबाइलची बॅटरी संपली, अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगून मोबाइल मागून त्यावर ओटीपी घेऊन खात्यातील पैसे ...
चंद्रपूर : माझ्या मोबाइलची बॅटरी संपली, अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगून मोबाइल मागून त्यावर ओटीपी घेऊन खात्यातील पैसे गहाळ केले असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे कुणी अनोळखी माणूस मोबाइल मागून फसवणूक करीत असल्यास काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले. सध्या तरी असे प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले नाही.
खात्यामधून पैसे लंपास करण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. आता हे चोरटे ज्येष्ठ व्यक्तींना हेरून माझ्या मोबाइलची बॅटरी संपली, बॅलन्स संपला. एक अर्जंट फोन करायचाय, असे इमोशनल करून फोन मागतात आणि त्यातून ओटीपी घेऊन पैसे गहाळ करतात.
बॉक्स
आपल्या बँक खात्यासंदर्भाची माहिती कुणालाही देऊ नका. लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचे मेल किंवा मेसेज आल्यास आपण खरेच लॉटरी काढली का, स्पर्धेमध्ये भाग घेतला का, नसेल घेतला तर तो मेल किंवा मेसेज ओपन करू नका. फसवणूक झाली असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करा.
-निशिकांत रामटेके,
सहायक पोलीस निरीक्षक सायबर क्राइम, चंद्रपूर
बॉक्स
ही घ्या काळजी
आपल्या बँक खात्यासंदर्भातील माहिती कुणालाही देऊ नका. बँकेचे अधिकारी कधीच माहिती विचारत नाही.
बॉक्स
बँकेचे अधिकारी कधीच फोन करून माहिती किंवा ओटीपी विचारत नाही. त्यामुळे कुणीही फोन करून खात्याची माहिती विचारल्यास देऊ नका.
अनोळखी व्यक्तीचे मेल किंवा मेसेज आल्यास संपूर्ण खातरजमा करूनच ते ओपन करावे. विनाकारणच्या मेलला किंवा मेसेजला रिप्लाय देऊ नका.