आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:27+5:302021-01-08T05:32:27+5:30
फोटो : आरोग्य शिबिरात उपस्थित आमदार किशोर जोरगेवार व अन्य. चंद्रपूर : दगदगीच्या जीवनात अनेक जणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत ...
फोटो : आरोग्य शिबिरात उपस्थित आमदार किशोर जोरगेवार व अन्य.
चंद्रपूर : दगदगीच्या जीवनात अनेक जणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र याचे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. कुटुंबाचा गाडा चालवताना आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने इंदिरानगर येथील हनुमान मंदिर येथे नि:शुल्क आरोग्य शिबिर व औषधोपचार शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला अघाडी शहर संघटिका वंदना हातगावकर, वैशाली मेश्राम, नीतेश बोरकुटे, कवडू गेडाम, जितेश गवळे, रविकांत टेंभुरकर, बंडू पेंदाम, सुलभा पेंदाम, अनू चांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. प्रवीण येरमे, डाॅ. शारदा येरमे, डाॅ. सुरज बियाणी यांच्या पथकाने जवळपास ३०० नागरिकांची तपासणी केली. यामध्ये बीपी, शुगर आदींची तपासणी करून नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले.