भारतीय कोयला खदान मजदूर संघाची द्वार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:30+5:302021-02-06T04:51:30+5:30
दरम्यान, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत नागपूर येथील मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी ) यांच्या कार्यालयापुढे होणाऱ्या धरणे ...
दरम्यान, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत नागपूर येथील मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी ) यांच्या कार्यालयापुढे होणाऱ्या धरणे आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय मजदूर संघाने केले आहे. १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत चार दिवस बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोवरी डीप, धोपटाळा, सास्ती व बल्लारपूर भूमिगत या सर्व आठही कोळसा खाणीत सकाळच्या पाळीत द्वार सभा घेऊन केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे, क्षेत्रीय अध्यक्ष जोगेंद्र यादव, अनिल निब्रड, शांताराम वांढरे, विवेक अल्लेवार, निकेश शिवहरे, पी.बी. पाटील, बादल गरगेलवार, गिरीश कोंतमवार, राजेंद्र राठोड, गणेश खाडे यांनी कामगारांच्या विविध समस्या आणि कोल इंडिया व केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण याविषयी जनजागृती केली.
सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत झालेल्या द्वारसभेत उपस्थित कामगारांनी जोरदार घोषणा दिल्या.