धोपटाळा वेकोलि प्रकल्पामुळे विकासाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:46 PM2018-12-26T22:46:28+5:302018-12-26T22:46:44+5:30
धोपटाळा वेकोलि प्रकल्पासमोरील अडचणी दूर झाल्या असून सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रकल्प विकासाला चालना देणार, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी (वा.) व वरोडा गावातील पोवनी-३ वेकोलि प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश वितरण करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धोपटाळा वेकोलि प्रकल्पासमोरील अडचणी दूर झाल्या असून सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रकल्प विकासाला चालना देणार, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी (वा.) व वरोडा गावातील पोवनी-३ वेकोलि प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश वितरण करताना ते बोलत होते.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार अॅड. संजय धोटे, वेकोलिचे प्रबंध निदेशक आर. आर. मिश्रा, कार्मिक निर्देशक संजय कुमार, निर्देशक (तांत्रिक) मनोज कुमार, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंह, खुशाल बोंडे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, जि.प.चे सदस्य सुनिल उरकुडे, सरपंच भाऊजी कोडापे, सरपंच साईनाथ देठे उपस्थित होते.
ना. अहीर म्हणाले, सुमारे १४४ कोटींचा आर्थिक मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. ७७२ प्रकल्पधारकांना नोकºया देण्यात येणार आहे. साखरी व वरोडा येथील दिव्यांग, वृध्द, महिला व अनुसूचित जमाती व इतर २८ प्रकल्पग्रस्तांना साडेसहा कोटींचे धनादेश प्रदान करण्यात आले. नागपूर वेकोलि मुख्यालयअंतर्गत आर्थिक मोबदल्याची रक्कम मंजूर झालेला पोवनी-३ हा पहिलाच प्रकल्प असल्याचेही ना. अहीर म्हणाले. केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पहिल्यांदाच कोळसा मंत्रालयाऐवजी नागपूर मुख्यालयाद्वारे ही रक्कम मंजूर करण्यात आली. या निर्णयामुळे अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नागपूर मुख्यालयाद्वारे मोबदला मिळण्याचा मार्ग सुकर झाला. अधिकाºयांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने या खाणीतील प्रकल्पग्रस्तांमध्ये मोबदल्यासंदर्भात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. ना. अहीर यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळाला आहे.