कोविड रूग्णांना डॉ. येरमेंकडून नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:45+5:302021-05-08T04:28:45+5:30

सास्ती : राजुरा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या पडत असून, दिवसागणिक होत असलेल्या मृत्यूंमुळे सर्वत्र भीतीचे ...

Dr. Kovid patients. Free treatment and guidance from Yermen | कोविड रूग्णांना डॉ. येरमेंकडून नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन

कोविड रूग्णांना डॉ. येरमेंकडून नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन

Next

सास्ती : राजुरा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या पडत असून, दिवसागणिक होत असलेल्या मृत्यूंमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रूग्णांची गैरसोय टळावी म्हणून ग्राम आरोग्य सेवा फाऊंडेशन, शाखा राजुराच्यावतीने डॉ. प्रवीण येरमे यांनी नि:शुल्क कोविड क्लिनिक उघडले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

राजुरा तालुक्यात वाढत्या कोरोना रूग्णांना योग्य रूग्णसेवा मिळावी, या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत मूळचे राजुरा येथील रहिवासी असलेले डॉ. प्रवीण येरमे यांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा घडावी, याकरिता आपल्या ग्राम आरोग्य सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. इर्शाद शेख, डॉ. समरीन शेख, तंत्रज्ञ शुभांगी गेडाम, क्रिष्णा गेडाम यांच्या सहकार्याने उपजिल्हा रूग्णालयासमोर कोविड क्लिनिक उघडले असून, कोरोनाबाधित रूग्णांना गृह अलगीकरणाकरिता आवश्यक नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत रूग्णांना उपचार व मार्गदर्शन केले जात आहे. सध्या कुठल्याही रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. प्रत्येक रुग्णाला रूग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसते. जे रूग्ण गृह अलगीकरणामध्ये राहू शकतात, त्यांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन या केंद्रात केले जात आहे. राजुरा तालुक्यातील रूग्णांनी कोविड क्लिनिकला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीण येरमे यांनी केले आहे.

Web Title: Dr. Kovid patients. Free treatment and guidance from Yermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.