कोविड रुग्णांना डॉ. येरमेंकडून नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:29+5:302021-05-09T04:28:29+5:30
राजुरा तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांना योग्य रुग्णसेवा मिळावी या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत मूळचे राजुरा येथील रहिवासी असलेले डॉ. ...
राजुरा तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांना योग्य रुग्णसेवा मिळावी या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत मूळचे राजुरा येथील रहिवासी असलेले डॉ. प्रवीण येरमे यांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा घडावी, याकरिता आपल्या ग्राम आरोग्य सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. इर्शाद शेख, डॉ. समरीन शेख, तंत्रज्ञ शुभांगी गेडाम, कृष्णा गेडाम यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयासमोर कोविड क्लिनिक उघडले असून, कोरोनाबाधित रुग्णांना गृहअलगीकरणाकरिता आवश्यक नि:शुल्क उपचार व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत रुग्णांना उपचार व मार्गदर्शन केले जात आहे. सध्या कुठल्याही रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसते. जे रुग्ण गृहअलगीकरणामध्ये राहू शकतात त्यांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन या केंद्रात केले जात आहे. राजुरा तालुक्यातील रुग्णांनी कोविड क्लिनिकला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीण येरमे यांनी केले आहे.