कोंबडीच्या बेंदव्याला अजगराचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:13+5:30
आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त्या कोंबडीची बेंदव्याचे झाकड उघडताच या दोघाही बंधूना मोठा धक्का बसला. त्यात भला मोठा अजगर विळखा घालून बसल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात कुक्कटपालनाचा व्यवसाय केला जात आहे. तेथील खुराड्यातील तीन कोंबड्यांवर अजगरावर ताव मारल्याची घटनाअंभोरा येथे मंगळवारी उघडकीस आली.
आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त्या कोंबडीची बेंदव्याचे झाकड उघडताच या दोघाही बंधूना मोठा धक्का बसला. त्यात भला मोठा अजगर विळखा घालून बसल्याचे दिसून आले. दोघांही तात्काळ वन्यजीव रक्षक सूरज दहाकी यांना माहिती दिली.
दहाकी चमूसोबत घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत अजगराने कोंबडी आणि अंडी फस्त केली होती. बऱ्याच प्रयत्नांनी अजगराला पकडण्यात यश आले.
हा अजगर फूट लांबीचा होता. अजगराला निसर्गमुक्त करण्यात आले. अजगराने कोंबडी आणि अंडी फस्त केल्याने थेरे यांचे नुकसान झाले.