बल्लारपुरात जेटींग मशीनने नाली सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:54+5:302021-07-31T04:27:54+5:30

बल्लारपूर : आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञानामुळे न होणारी कठीण कामे सुलभ होऊ लागली आहे. याचा प्रत्यय बल्लारपूर नगरपरिषदेमध्ये पाहायला ...

Drain cleaning by jetting machine in Ballarpur | बल्लारपुरात जेटींग मशीनने नाली सफाई

बल्लारपुरात जेटींग मशीनने नाली सफाई

Next

बल्लारपूर : आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञानामुळे न होणारी कठीण कामे सुलभ होऊ लागली आहे. याचा प्रत्यय बल्लारपूर नगरपरिषदेमध्ये पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेने जिल्ह्यात पहिली अशी मशीन आणली आहे की या जेटिंग मशीनने जाम असलेल्या नालीचे काम कमी कामगारात व दिवसभराचे काम एका तासात होणार असून यामुळे वेळेची बचत होणार आहे.

या जेटिंग मशीनचे प्रात्यक्षिक सध्या शहरातील काही वॉर्डात सुरु आहे. जिथल्या नाल्या (चोकअप) जाम आहेत. यावेळी स्वतः मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक नाली सफाई स्थळी उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करीत आहेत. आतापर्यंत या जेटिंग मशीनने साईबाबा वॉर्ड, हनुमान नगर व इतर वॉर्डातील चाेकअप झालेल्या नाल्यांची सफाई केली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोट

सध्या शहरात डेंग्यू, मलेरियाचे वातावरण आहे. अशात नाली सफाई गरजेची आहे. या जेटिंग मशीनमुळे पावसाळ्यात चोकअप होणाऱ्या नाल्या साफ राहणार आहे. यामुळे चाेकअप झालेल्या नाली सफाईची समस्या सुटणार आहे.

-विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, नगरपरिषद,बल्लारपूर.

Web Title: Drain cleaning by jetting machine in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.