घोडाझरी नहराचा उपसा करुन पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:18+5:302021-08-17T04:33:18+5:30

तळोधी बा : गेल्या आठवडाभरापासून पावसाने डोळे वठारल्यामुळे नहरालगतचे रोहणे पाण्याअभावी रखडले आहे. घोडाझरी नहराचा उपसा करून पाणी सोडण्याची ...

Drain the Ghodazari canal and release the water | घोडाझरी नहराचा उपसा करुन पाणी सोडावे

घोडाझरी नहराचा उपसा करुन पाणी सोडावे

Next

तळोधी बा : गेल्या आठवडाभरापासून पावसाने डोळे वठारल्यामुळे नहरालगतचे रोहणे पाण्याअभावी रखडले आहे. घोडाझरी नहराचा उपसा करून पाणी सोडण्याची मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

नागभीड तालुक्यात येत असलेला घोडाझरी तलाव यावर्षी ९० टक्के भरलेला आहे. या तलावाअंतर्गत जवळपास ७५०० हेक्टरी जमीन ओलिताखाली येत असते. घोडाझरी तलावाचे पाणी सिंदेवाही तालुक्यातील वानेरी टेकडी या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाते. मात्र, या घोडाझरी तलावाच्या मुख्य मायनरपासून तळोधी बा. वितरिका व नवरगांव वितरिकेवर मोठ्या प्रमाणात केरकचरा वाढलेला आहे. साफसफाई करण्यात आलेली नाही. जागोजागी मोठे-मोठे भगदाड पडलेले आहे. सिंचाई विभागाचे दुरूस्तीकडे आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्याची धान रोहिणी रखडली आहे.

कोट

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने डोळे वठारल्यामुळे या भागातील अनेकांच्या शेतातील रोहिणी रखडली आहे. सिंचाई विभागाचे नहर दुरूस्तीकडे दुर्लक्ष होते आहे. त्वरित नहराचा उपसा करून घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यात यावे.

श्याम बागडे, सामाजिक कार्यकर्ता, पुलगाव.

Web Title: Drain the Ghodazari canal and release the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.