देवपायली येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:14+5:302021-06-03T04:20:14+5:30

तळोधी बाः नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायत अंतर्गत १४ वित्त आयोगातून नाली पँकिंग बांधकाम झाले. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ...

Drainage construction at Devpayali is of inferior quality | देवपायली येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे

देवपायली येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे

Next

तळोधी बाः नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायत अंतर्गत १४ वित्त आयोगातून नाली पँकिंग बांधकाम झाले. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असून संबंधित ठेकेदाराने देवपायली येथील ग्रामसेवकाशी हातमिळवणी करून परस्पर बिलाची उचल केलेली असल्याने त्या दोघांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मौजा देवपायली येथील यशवंत मरसकोल्हे यांच्या घरापासून ते गोपीचंद मरसकोल्हे यांच्या घरापर्यत १४ वित्त आयोगातून २६ मीटर नाली बांधकाम करण्यात आले. यावेळी देवपायली येथील ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर रामाजी नवघडे, सदस्य वैशाली चंद्रकात भोयर, सदस्य ज्योती सुधीर मडावी यांनी नाली बांधकाम करतेवेळी कमी प्रमाणात सळाक व गिट्टीचे मटेरियल वापरुन नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे संबंधित ठेकेदार व ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून बांधकामाची योग्य चौकशी करण्यासाठी १ एप्रिल २०२१ ला नागभीड पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. संबंधित नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून त्या बांधकामाचे मूल्यांकन न करता बिलाची उचल करण्यात आली असून संबंधित बांधकामाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती देवपायली येथील ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर नवघडे, सदस्य ज्योती मडावी, संतोष कुंभरे व सुधीर मडावी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Web Title: Drainage construction at Devpayali is of inferior quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.