मनपातील स्वच्छता कामगारांना मलनिस्सारणाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:53+5:302021-01-04T04:23:53+5:30
चंद्रपूर : शहर महानगरपालिकांतर्गत केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहर महानगरपालिकेची निवड स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेज ...
चंद्रपूर : शहर महानगरपालिकांतर्गत केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहर महानगरपालिकेची निवड स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेज स्पर्धा राबविण्यासाठी शासनाने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेत कार्यरत मनपा कंत्राटी स्वच्छता कामगारांना मनापाच्या स्थाथी समिती सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त विशाल वाघ तर प्रशिक्षक म्हणून मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी संतोष गर्गेलवार उपस्थित होते.
मैला व्यवस्थापन यांत्रिकी पद्धतीने करण्याचे या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कारवाई सतत सुरु आहे. असुरक्षित पद्धतीने मैला व्यवस्थापनावर मनपा क्षेत्रात पूर्णत: बंदी आहे. याबाबत कामगारांना महत्व पटवून देण्यात आले. यावेळी शहरात उत्कृष्ट काम करणाऱ्या बहादुर हजारे, आकाश ग्रॉवकर, नितेश पेसाडेली, विशाल हाते, राम बिरिया, राज खोडे, नितीन खोटे, मिलिंद महातव, अरविंद खोडे, संदीप महातव, सुनील संमुद, मंगेश महातव, उत्तम मडावी, मोहन बांबोळे, मधुकर मासबोईनवार, पेंटु दुर्गे, राजेश भुते या स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला.
बॉक्स
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
हाताने मैला व्यवस्थापन करण्यास बंदी आहे. कामगारांना यांत्रिकी पद्धतीने काम करण्यास संपूर्ण यंत्रसामुग्री व अद्ययावत पी.पी. ई कीट देण्यात येणार आहे. तरीसुद्धा हाताने मैला व्यवस्थापन करीत असल्यास तक्रारीकरिता टोल फी १४४२० हा क्रमांक सुरु करण्यात आला असून २४ तास सुरु राहणार आहे. मनपा क्षेत्रात रिस्पॉन्सिबल सॅनिटेशन ऑथारिटी स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष आयुक्त राहणार आहेत. तक्रारीचे निवारण करण्याकरिता ये युनिट कार्य करणार आहे.