हवाई सफरीचे स्वप्न झाले साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2017 12:35 AM2017-06-26T00:35:16+5:302017-06-26T00:35:16+5:30
लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेत दरवर्षी होत असते. त्यामध्ये गडचांदूरच्या महात्मा गांधी विद्यालयाची श्रृती येवले सहभागी झाली.
लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : गडचांदूरच्या श्रृतीने घेतला आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेत दरवर्षी होत असते. त्यामध्ये गडचांदूरच्या महात्मा गांधी विद्यालयाची श्रृती येवले सहभागी झाली. त्यात ती विजेती झाली. हवाई सफरीची संधी मला मिळेल, याची खात्री नव्हती. परंतु माझी निवड झाल्याचे कळले. तेव्हा मला मनस्वी आनंद झाला, असे श्रृतीने सांगितले.
ती म्हणाली, स्पर्धेतील विजेते विद्यार्थी २१ जून रोजी पहाटे ६ वाजता लोकमत भवन, नागपूर येथून विमानतळाकडे निघाले. ७.३० वाजता विमानात प्रवेश केला तेव्हा खूप आनंद झाला. दिल्ली येथे ९.३० वाजता पोहोचल्यानंतर तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी निघालो. फिरण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वे संग्रहालय पाहून बरेच शिकायला मिळाले. गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट या ठिकाणी भेट दिली.
राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी आमचे कौतुक केले. उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी आमच्याशी संवाद साधला. भविष्यात तुमचे स्वप्न काय आहे, असे विचारले. हवाई सफरीमध्ये ‘लोकमत’ने आम्हा सर्व ३५ विद्यार्थ्यांची काळजी घेतली. नाश्ता, जेवन, चहाची व्यवस्था वेळेवर केली. परत रात्री ९.३० वाजता नागपूर विमानतळावर पोहचलो. एकंदरीत हवाई सफर स्मरणीय ठरली आहे.
संस्काराचे मोती स्पर्धा लोकमतने सुरू करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली आहे. खुप शिकण्यास मिळाले. ‘लोकमत’चा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, असे श्रृतीने सांगितले.
श्रृती येवले हिचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव प्रा.डॉ. अनिल चिताडे, सहसचिव धनंजय गोरे, जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, मुख्याध्यापक गिरीधर बोबडे, उपमुख्याध्यापक रमेश पाटील, उपप्राचार्य शरद जोगी, पर्यवेक्षक विलास बोढे, कृष्णा बत्तुलवार, प्रशांत उपलेंचवार तथा शिक्षकांनी कौतुक केले.
या सफरीसाठी आईबाबांनीसुद्धा संमती दिली. लहानपणापासून विमानात बसण्याचे स्वप्न बघत होती. ‘लोकमत’मुळेच हवाई सफरीचे स्वप्न साकार झाल्याचे श्रृती केशवराव येवले हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.