विमानतळाचे स्वप्न साकार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:04 PM2018-12-27T23:04:01+5:302018-12-27T23:04:16+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

The dream of the airport will come true | विमानतळाचे स्वप्न साकार होणार

विमानतळाचे स्वप्न साकार होणार

Next
ठळक मुद्दे१९ जणांना वाटप : जमीनधारकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात मोडत असून येथे कोळसा] सिमेंट, पेपरमिलचे कारखाने आहे. तसेच येथील बिटी वुड म्हणून सागवान लाकूड भरतात प्रसिद्ध आहे. या सर्व कारखानदाराचे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद या परिसरात प्रमुख वरीष्ठ स्तरावरील कार्यालय आहे. त्यामुळे त्यांना कामे करण्यासाठी विमानाने जाणे-येणे करणे सोईस्कर होते. बºयाच कारखानदारांना या जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल हवा आहे.
मात्र विमानतळाअभावी ते पाठ दाखवित होते. याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेवून विमानतळाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जमिनीची शोध मोहीम सुरु केली व यात राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील जमीन उपलब्ध करुन विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. आता जमीनधारकांना प्रति एकर आठ लाख रुपयाप्रमाणे १९ पट्टे धारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली आहे. एकूण ६३ पट्टेधारक असून दररोज पाच पट्टेधारकांना रजिस्ट्री करुन रक्कम अदा केली जात आहे.
या विमानतळासाठी एकूण ७२० एकर जमीन विमान तळ प्राधिकरणास देण्याचे ठरले आहे. यात खाजगी जमीन २८७ एकर, वन जमीन व्१८५ एकर व सरकारी जमीन २४७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.
शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाकरिता भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच वन जमिनीचे प्रस्ताव वन प्रबोधीनी चंद्रपूरमार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना मोबदलाबाबत भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी विमानतळ प्राधिकरणास यावर निर्णय घेण्यासाठी कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आम जनता, कारखाने धारक, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते तसेच गडचिरोली व आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियाल (तेलंगणा) या जिल्ह्यातील लोकांना विमानतळाचा लाभ घेता येणार आहे. मूर्ती हे गाव मध्यभागी असल्यामुळे प्रवास करणे सोयीचे होणार आहे. एका वर्षाच्या आत विमानतळ सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: The dream of the airport will come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.