भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:48 PM2018-02-19T23:48:25+5:302018-02-19T23:48:46+5:30

घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

The dream of a seamstress is broken | भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले

भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले

Next
ठळक मुद्देपात्र लाभार्थ्यांना डावलले : उपोषणानंतरही पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून बोळवण

विराज मुरकुटे।
आॅनलाईन लोकमत
पोंभूर्णा : घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. घरकुलासाठी संघर्ष करणाऱ्या भगिरथचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
घाटकुळ ग्रा.पं.मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ग्रा. पं. पदाधिकारी व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे ठराव न घेता मर्जीने गरीब व पात्र लोकांची नावे वगळून गरीब शेतमजूरांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप भगिरथ झाडे यांनी आरोप केला आहे.
ग्रामसभा तहकूब दाखवून केवळ औपचारिकता ठेवून ठराव लिहिण्यात आला. यावर भगिरथ झाडे व इतरांनी आक्षेप नोंदविला. एवढे करूनही न्याय मिळाला नाही. घरकुलसाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. पण, निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पं. स. चे उपसभापतींच्या गावातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र स्थानिक पुढारी व तालुका प्रशासनाचेही जाणीवपूर्वक दूर्लक्ष सुरू असल्याचा आरोप होत आहे. घरकुलसाठी पात्र असूनही लाभ का नाही, यासाठी प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले होते. न्याय मिळविण्यासाठी पंचायत समितीसमोर कुटुंबांसोबत ठिय्या मांडला होता. पण, संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देवून विषयाकडे कानाडोळा केला. शासनाकडून अनेक योजना सुरू आहेत.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश असतानाही स्थानिक पातळीवर चुकीचे निकष लावून अन्याय केल्याच्या घटना तालुक्यात वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अन्यायाविरोधात कार्यकारी अधिकाºयांकडून चौकशी करून घरकूल मिळवून द्यावे. अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा भगिरथ झाडे यांनी निवेदनातून केला आहे.

सदर प्रकार चुकून झाला असून शहानिशा करण्यात आली नव्हती. यापुढील यादीत घरकुल देण्यात येईल.
- ममता बक्षी
ग्रामसेविका, घाटकुळ

घरकुल अन्यायग्रस्तांनी तक्रार केल्यास तातडीने चौकशी करून न्याय देण्यात देवू.
- विनोद देशमुख
उपसभापती, पं.स. पोंभूर्णा

सदर प्रकरण कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
-शशिकांत शिंदे
संवर्ग विकास अधिकारी, पं.स. पोंभूर्णा

Web Title: The dream of a seamstress is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.