चालक परवाना काढणे महागले
By admin | Published: January 15, 2017 12:42 AM2017-01-15T00:42:22+5:302017-01-15T00:42:22+5:30
शिकावू परवाना काढण्यापासून ते आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यापर्यंत आणि नवीन वाहनाच्या नोंदीपासून वाहन ...
आरटीओच्या शुल्कात वाढ : परिवहन आयुक्तांचे निर्देश
परिमल डोहणे चंद्रपूर
शिकावू परवाना काढण्यापासून ते आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यापर्यंत आणि नवीन वाहनाच्या नोंदीपासून वाहन हस्तांतरापर्यंतच्या दरामध्ये उपप्रादेशिक परिवाहन कार्यालयाने पाच ते दहापटीने वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी पूर्वीपेक्षा अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने २९ डिसेंबरला केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परिवहन आयुक्ताने राज्यातील सर्व आरटीओना वाढीव दरानुसार शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यात प्रत्येक आरटीओ कार्यालयात नवीन दरानुसार शुल्क आकारणी केली जात आहे.
पूर्वीच्या दरानुसार शिकावू परवाना काढण्यासाठी ३० रुपये दर आकारण्यात येत होते. मात्र आता वाढीव दरानुसार १५० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच शिकावू परवाना फेरपरीक्षेसाठी यापूर्वी कुठल्याही प्रकारचे दर आकारले जात नव्हते. मात्र नव्या नियमानुसार, त्याकरिता ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच नियमित परवाना फेरचाचणी देताना यापुढे ५० रुपयांऐवजी ३०० रुपये द्यावे लागतील. तसेच परवान्याची वैधता संपल्यानंतर नूतनीकरणास उशीर झाल्यास ५० रुपये प्रति वर्ष दंड आकारला जात होता. ती रक्कम आता १ हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच वाहनावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी वाहनाच्या प्रकारानुसार १०० रुपयांवरुन ५०० रुपये ते ३ हजार रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच तो बोजा उतरवून नवीन नोंदणी पुस्तकासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल. ही शुल्कवाढ प्रत्येक आरटीओ कार्यालयात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उपप्रादेशिक कार्यालयात कोणतेही काम करण्यासाठी पूर्वीपेक्षा अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
दलालांकडून लूट
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अनेक दलालांनी शिरकाव केला होता. त्यामध्ये परवाना काढण्यापासून ते आॅटोरिक्षा चालक बॅच नंबर काढणे, आंतराष्ट्रीय वाहन परवाना आदी कामे करुन देण्यासाठी दलाल संक्रीय झाले आहेत. त्याच्या माध्यमातून कार्यालयातील कोणतेही काम केला. ते नागरिकांची प्रचंड लूट करीत आहेत. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ४०० ते ५०० रुपये आणि नियमित परवाना काढण्यासाठी ६०० ते ७०० रुपये घेण्यात येतात.