वृक्षलागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:49 PM2019-06-22T23:49:26+5:302019-06-22T23:50:09+5:30
वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे.
उदय गडकरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे. शिवाय खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच वृक्षलावडीच्या कार्यक्रमात ड्रोम कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. हीच बाब या मोहिमेवर विश्वासार्ह्यता निर्माण ठरत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात महाराष्ट्र शासनाने ५५ कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला आहे. त्यापैकी ३३ कोटी वृक्ष लागवड यावर्षी करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे १ जूनपूर्वीच तयार करण्यात आले आहेत.
यावर्षी पावसाने दगा दिल्याने हा कार्यक्रम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी खोदलेले खड्डे खरोखरच खोदले की नाही याची खातरजमा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेराद्वारे खड्ड्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. शिवाय वृक्ष लागवडीनंतरही पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.
सावली वनपरिक्षेत्रांतर्गत ३४ ठिकाणी रोपवन घेण्यात आले असून सुमारे ७२७ हेक्टर इतक्या जागेत सात लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ठ सावलीला असून त्यानंतर वरोरा वनपरिक्षेत्राचा क्रमांक लागतो.
यावर्षी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराद्वारे वृक्ष लागवडीची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष खोदलेले खड्डे, लावण्यात येणाºया वृक्षांची माहिती मिळणार आहे. या प्रयोगामुळे वनविभाग तसेच वनाधिकाºयांवरील विश्वासार्हता वृद्धींगत होईल.
- जी.व्ही. धांडे
वनपरिक्षेत्राधिकारी, सावली