अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांची आता गय नाही, अधिकारी आवळणार मुसक्या

By साईनाथ कुचनकार | Published: May 8, 2023 07:35 PM2023-05-08T19:35:30+5:302023-05-08T19:35:39+5:30

प्रशासनातील सर्व विभाग लागणार कामाला

Drug traffickers are no longer safe, the authorities will take action | अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांची आता गय नाही, अधिकारी आवळणार मुसक्या

अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांची आता गय नाही, अधिकारी आवळणार मुसक्या

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थ वनस्पती (खसखस, गांजा) लागवड किंवा पदार्थाची वाहतूक तसेच विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, कृषी, शिक्षण, पोलिस आदी विभाग अमली पदार्थ विक्री, वाहतूक करणाऱ्यांकडे लक्ष ठेवणार असून जनजागृतीही करणार आहेत.

अमली पदार्थाची जिल्ह्यात कुठे लागवड होत असेल तर कृषी विभागाने कृषी सहायकामार्फत तपासणी करावी. गोपनीय पद्धतीने लोकांकडून याबाबत माहिती मिळवावी, शिक्षण विभागाने शालेय स्तरावर अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी. सरकारी किंवा खासगी कुरिअरमार्फत कुठे वाहतूक होते का, याची तपासणी करावी. खासगी कुरिअरधारकांना याबाबत पोलिस विभागाने पत्र लिहून याबाबत अवगत करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, केंद्रीय अबकारी विभागाचे अधीक्षक श्याम सोनकुसरे, डाक अधीक्षक गणेश सोनुने, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त उमाकांत बाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिजीत लिचडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.
बाॅक्स

अशी आहे समितीची कार्यकक्षा :
जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे. जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घेणे. डार्कनेट व कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही, याकडे लक्ष देणे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या व त्यांना कोणत्या अमली पदार्थाचे व्यसन आहे, याबाबत माहिती प्राप्त करणे. ड्रग डिटेक्शन किट व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करणे. जिल्हास्तरावर अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती अभियान राबविणे.

बंद कारखान्यांवर राहणार लक्ष

जिल्हा पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती संकलित करून त्याबाबतचा डेटाबेस तयार करावा लागणार आहे. एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे तसेच जे कारखाने बंद आहे त्यावर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.

Web Title: Drug traffickers are no longer safe, the authorities will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.