चंद्रपुरातील उच्चभू्र परिसरातून दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:20 PM2018-11-23T22:20:16+5:302018-11-23T22:20:40+5:30
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन वडगाव वॉर्डातील एका घरात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख १७ हजार रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. रुपेश गानफाडे, रामकृष्ण झोडे, दिनेश झोडे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन वडगाव वॉर्डातील एका घरात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख १७ हजार रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. रुपेश गानफाडे, रामकृष्ण झोडे, दिनेश झोडे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चंद्रपुरातील वडगाव परिसरातील विनोद गनफाडे यांच्या घरी दारुसाठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी विनोद गनफाडे यांच्या घरी धाड टाकली. यावेळी घराची झडती घेतली असता, १५ पेट्या विदेशी दारु आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्दमाल जप्त केला. यावेळी विनोद गनफाडेचा भाऊ रुपेश गनफाडे, व त्याचे दोन साथीदार रामकृष्ण झोडे व दिनेश झोडे यांना अटक करण्यात आली. ही करावाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र वैरागडे, अविनाश दासमवार, मयूर येरणे, अमझद खान यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले.
रामपुरात एकाला अटक
राजुरा : राजुरा पोलिसांनी रामपूर फाट्यावर नाकाबंदी करुन एका वाहनातून देशी व विदेशी दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक अनिलकुमार अंकलू रेड्डी याला अटक केली. ही करवाई गुरुवारी रात्री राजुरा पोलिसांनी केली.