दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:26+5:302021-07-07T04:34:26+5:30

चंद्रपूर : मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यास वाहतूक पोलिसांना बंदी आहे. त्यामुळे मद्यपी ...

Drunk driving; Corona cools the action! | दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !

दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !

Next

चंद्रपूर : मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यास वाहतूक पोलिसांना बंदी आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्धची कारवाई करण्यावर मर्यादा आल्या आहे. मागील सहा महिन्यात पोलिसांनी केवळ ९६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. दरम्यान तोंडावर मास्क न घालणे, विनाकारण घराबाहेर पडणे अशा व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता. त्यातच ब्रेथ ॲनालायरझर बंद त्यातच सर्वजण मास्क घालून राहत असल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्याविरुद्धच्या कारवाया कमी झाल्या. सन २०१९ मध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०९० जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग आल्याने केवळ २७५ जणांवर कारवाई केली. २०२१मध्ये मे महिन्यांपर्यंत केवळ ९६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बॉक्स

ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद करण्याचा आदेश पोलीस विभागाला देण्यात आला. यादरम्यान मास्क घालून फिरणे सुरू असल्याने मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई थंडावली होती. मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बॉक्स

लॉकडाऊन काळात ४० लाखांचा दंड वसूल

कोरोनाकाळात ब्रेथ ॲनालायझरचा बंद असल्याने मद्यपी वाहनचालकांविरुद्धची कारवाई थंडावली होती. मात्र संचारबंदीचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार २१७ जणांवर कारवाई करून ३९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. अद्यापही वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण जिल्हाभरात कारवाईची मोहीम सुरू आहे.

बॉक्स

मद्यपीचालकांवर पोलीस स्टेशनद्वारे कारवाई करण्यात येते. कोरोना महामारीमुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करताना अनेक मर्यादा आल्या होत्या. ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यावर बंदी होती. तसेच कोरोना संचारबंदीत इतर कारवाईवर भर होता. लॉकडाऊन काळात मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या १६ हजार २१७ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ३९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणे धोक्याचे आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, त्यामुळे अपघाताला आळा घालणे सहज शक्य होईल.

-हृदयनाथ यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक

------

बॉक्स

सन २०१९ १०९०

सन २०२० २७५

सन २०२१ ९६

Web Title: Drunk driving; Corona cools the action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.