रस्त्याअभावी पहाडावरील कोलाम आदिवासींचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:32 AM2018-06-22T00:32:03+5:302018-06-22T00:32:03+5:30
तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे.
कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. उत्तरेकडील भारोसा, इरई, विरुर, अंतरगाव, पिपरी, कोडसी बुज व अकोला, पारडी, कोठोडा, परसोडा, दक्षिणेकडील थिप्पा, उमरहिरा, जाभुलधरा - टांगाळा - सावलहिरा, येरगव्हाण, पिपर्ड, चिंचोली, वडगाव, इंजापूर, बैलमपूर, मानोली, पूर्व भागातील उपरवाही, धुनकी, बाखर्डी, नवेगाव-वरोडा हे रस्ते अद्यापही थेट जुळली नाही. बाखर्डी, नांदा, कढोली, नारंडा, जेवरा, गांधीनगर, कान्हाळगाव, कोरपना, कुसळ, पिपर्ड, नारंडा, लोणी, शेरज, कोडसी गावे अजुनही एकमेकांशी जुळू शकले नाही. सावालहिरा, येल्लापूर, बोरगाव, सिंगार पठार, शिवापूर आदी राज्य सीमा मार्ग रखडला आहे. कागदावर प्रस्तावित आराखडा तयार असला तरी कामाला सुरुवात झाली नाही. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष तातडीने दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.