अवैध दारू विक्रीवर निर्धाराने प्रतिबंध करणार

By admin | Published: December 8, 2015 12:51 AM2015-12-08T00:51:52+5:302015-12-08T00:51:52+5:30

विज्ञानाने दारू हे आनंदपेय समजून कालबाह्य केली आहे. मानवाची हानी दारूमुळे होते.

Due to the ban on the sale of illegal liquor | अवैध दारू विक्रीवर निर्धाराने प्रतिबंध करणार

अवैध दारू विक्रीवर निर्धाराने प्रतिबंध करणार

Next

सुशीलकुमार नायक : विसापुरात दारूबंदीसंदर्भात सभा
बल्लारपूर : विज्ञानाने दारू हे आनंदपेय समजून कालबाह्य केली आहे. मानवाची हानी दारूमुळे होते. दारूमुळे महिलांना असुरक्षितता आणि अमानवीय अत्याचारांना बळी पडावे लागते. दारूनियंत्रण व दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु करण्यासाठी जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. तरीही अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैध दारू विक्रीवर आता निर्धाराने प्रतिबंध करण्याचा मानस परिविक्षाधीन उपजिल्हा पोलीस अधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी केले. बुधवारी विसापूर येथील सभेत ते बोलत होते.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात नागरीक व पोलीस प्रशासनात समन्वयसाधून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने घेण्यात आली. त्यावेळी नागरिकांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रिता जिलठे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच सुनील रोंगे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कोडापे, सुरेखा इटनकर, नीता वनकर, शशीकला जीवने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण इटनकर, माजी अध्यक्ष भास्कर गिरडकर, माजी अध्यक्ष मनोज काकडे, पी. एल. शेंडे, श्यामराव देठे यांची उपस्थिती होती.
यावेळी दारूबंदीसंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सभेचे संचालन संतोष निपुंगे यांनी तर आभार सरपंच रिता जिलठे यांनी मानले. सभेला पोलीस कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to the ban on the sale of illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.