जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:54 PM2019-02-01T22:54:20+5:302019-02-01T22:55:01+5:30

शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.

Due to the chaos of life on the bus from January | जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

Next
ठळक मुद्देदुष्काळाने तालुका बकाल : जलस्रोतही पडले कोरडे

शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.
शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घनपठार गावात ६० घरांची वस्ती असून तीनशेच्या जवळपास येथील लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. गेल्या २०- २५ वर्षांपूर्वी झºयातील पाण्यावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाईप लाईनद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही वर्षातच बट्टयाबोळ झाला. पुन्हा त्या नागरिकांना झऱ्यातील पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली. अनेक वेळा मागणी केल्यानंतर गावात पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही त्या योजनेचे काम पुर्ण झाले नाही. आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दूर होईल अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.
जनावरांचेही होताहेत हाल
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात दरवर्षीच निसर्गाचा पाऊस दगा देतो. यावर्षीसुध्दा तीच परिस्थिती निर्माण झाली. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र नंतर परतीच्या पावसाने पुर्णत: पाठ फिरविल्याने शेतकºयांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाच आता पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे माणसांबरोबर आता जनावरांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहेत. खरीप हंगामाने धोका दिला यातून सावरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि हुडहुडीमुळे रब्बी हंगामावरही निसर्ग कोपतो की काय, अशी शंकाच वर्तवली जात आहे. असे जर झाले तर जनावरे जगवायची कशी, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत जनावरे विकत असल्याचेही बोलले जात आहे.
तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच!
घनपठारच नव्हे तर तालुक्यातील घोडणकप्पी, चलपतगुडा, टेकामांडवा, पोचुगुडा, खडकी, अंतापूर, पिटीगुडा अशी अनेक गावे दरवर्षीच पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असतात. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे घनपठारसह अनेक गावात जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ पोहोचली असून संबंधित अधिकाºयांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा गावात तातडीने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.

Web Title: Due to the chaos of life on the bus from January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.