आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:49 PM2017-09-07T23:49:28+5:302017-09-07T23:49:46+5:30
नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे. त्यामुळे निवडणूक असणाºया ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र या आचारसंहितेचा फटका ग्रामपंचायतींच्या विकास कामांना बसला असून निवडणूक होईपर्यंत विकास कामे आता अडली आहेत.
सार्वत्रिक निवडणूक असणाºया ग्रामपंचायतींमध्ये मूल तालुक्यातील बाबराळा, चकदुगाळा, बोंडाळा खूर्द, बेंबाळ, गडीसुर्ला, उश्राळा व आकापूर या ७ ग्रामपंचायती तर बल्लारपूर तालुक्यातील बामणी दु., कोठारी, काटवली, कवडजई, इटोली या पाच, नागभीड तालुक्यातील मिंथूर, मांगली अरब, चिखलगांव, गोविंदपूर, गिरगाव, पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर, बोर्डा झुलुरवार, राजूरा तालुक्यातील विरुर स्टेशन, देवाडा, डोंगरगांव, हरदोना खुर्द, कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ, येरगव्हाण, कवठाळा, कोळशी बुज, विरुर गाडे, अंतरगाव, माथा, बाखर्डी, निमणी, भद्रावती तालुक्यातील चिचोली, धानोली, चारगाव, विस्लोन, रानतळोधी, गुंजाळा, टेकाडी, चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे, रेंगाबोडी, सोनगाव वन, सावरी बिडकर, जिवती तालुक्यातील लांबोरी, धनकदेवी, नंदप्पा, चंद्रपूर तालुक्यातील धानोरा, येरुर, जुनोना, चोरगाव दाताळा व वरोरा तालुक्यात दहेगाव अशा ५२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शासनाकडून यावर्षी अनेक ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी दिला आहे. या निधीतून लाखो रूपयांची कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. यात रस्ते, नाली, विहिर, पाणी पुरवठा योजना अशी कामे केली जात आहेत. कोठारी येथे पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होवून योजनेचे ४ सप्टेंबरला लोकार्पण होणार होते. मात्र आचारसंहितेमुळे ही कामे अडली आहेत.
२३ सप्टेंबरला जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असून या गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक होणाºया सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तहसिलदार यांनी निवडणुकांची नोटीस प्रसिध्द करण्याची तारीख १४ सप्टेंबर असून नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत चालणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. त्याचदिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढणाºया उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होणार असून मतमोजणी १६ आॅक्टोबर रोजी होणार आहे.