चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:17 AM2017-11-25T11:17:34+5:302017-11-25T11:18:00+5:30
वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.
शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासूनच दबलेल्या कामगाराला काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र साठ ते सत्तर मीटर शेकडो टन कोळसा वरून असल्याने शनिवारी सकाळी ७-३० वाजता कामगाराचा मृततदेह काढण्यात आला. तेलवासा खुल्या खाणीत कोळसा फेस वरून ३०० मिटर उंच आहे. याचे बनवलेले बेंच पूर्वीपासूनच धोकादायक होते. त्यामुळे गेल्या वर्षी वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिकाºयांनी खाण बंद करण्याचे आदेश दिले होते. सविस्तर अधिक वृत्त लवकरच देत आहोत.