रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:34 PM2018-11-16T22:34:05+5:302018-11-16T22:35:01+5:30

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाºया धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.

Due to the dust on the road, cotton black | रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याची दुर्दशा कायम : वारंवार तक्रार केल्यानंतरही कुणी लक्ष देईना !

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाऱ्या धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.
राजुरा तालुक्यातील बहुतांश रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वेकोलि परिसरातील बहुतांश रस्ते धुळीने माखले आहे. गोवरी-पोवनी, साखरी, वरोडा, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्गावर रस्त्याच्या धुळीने रस्त्यालगत असलेली पिके पूर्णत: काळवंडली आहे. या रस्त्यावर दिवसरात्र जड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून रस्त्याचे बारा बाजले आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच धूळ उडत असते. धुळीमुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णत: खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला रस्त्याची दूरवस्था कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.
पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने पिकांचा टवटविपणा निघून जातो.
परिणामी पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. वेकोलि परिसरातून जाणारे बहुतांश रस्ते सदैव धुळीने माखले असतात. शेतपिके रस्त्यालगत असल्याने त्याचा मोठा परिणाम पिकांवर होऊन पिके काळवंडली जातात. या धुळीचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
कापूस वेचणीला मजूर येईना
रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने पिकांवरही धुळीचा थर जमा झाला आहे. पिकांत गेले तरी कपडे पूर्णत: काळेकुट्ट होतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणीला मजूरही येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना घरातील सदस्य घेऊ नच नाईलाजाने कापूस वेचणी करावी लागत आहे.
कधी उजळणार ग्रामीण रस्त्याचे भाग्य ?
राजुरा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणाात हाल होत आहे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. असे असतानाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

Web Title: Due to the dust on the road, cotton black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.