महामारीमुळे होळीचे रंग यंदाही फिकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:00 AM2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:31+5:30

काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात्याच एक भाग म्हणून गर्दी जमविण्यावर तसेच सण समारंभावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नाही तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र नागरिक फारसे गंभीर नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Due to the epidemic, the colors of Holi are still fading | महामारीमुळे होळीचे रंग यंदाही फिकेच

महामारीमुळे होळीचे रंग यंदाही फिकेच

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचे संकट : साध्या पद्धतीने करावा लागणार सण साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, बाजारपेठेमध्येही पाहीजे तसा उत्साह नसल्यामुळे छोट्या, मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. रंगपंचनीच्या पूर्वसंधेलाही व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही निरुत्साह बघायला मिळाला. त्यामुळे होळीचे रंग यावर्षीही उडालेलेच आहे.
होळी सणावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मर्यादा आली आहे. कोरोनाच्या सावटामध्येच होळी साजरी करावी लागणार असल्याने रंग खेळण्याचा आनंदही घेता येणार नाही.
काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्यात्याच एक भाग म्हणून गर्दी जमविण्यावर तसेच सण समारंभावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नाही तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र नागरिक फारसे गंभीर नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. होळीनिमित्त नागरिक रंगोत्सव साजरा करतात. यासाठी काही गावांत सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाते. मात्र यावरही निर्बंध आले आहे.
यावर्षी कोरोनाचे सावट घोंघावत आहे. घराबाहेर पडताना संसर्गाची धास्ती वाढत आहे. 
त्यामुळे होळी घरच्या घरीच साजरी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. परिणामी बाजारपेठेमध्येही निरुत्साह बघायला मिळत आहे.
 

पोलिसांचा बंदोबस्त
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तसेच होळीनिमीत्त गर्दी लक्षात घेता चंद्रपूर शहरातील विविध चौकामध्ये सायंकाळच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.  दरम्यान सायंकाळी संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. जटपुरा गेट, गांधी चौक तसेच गोलबारातही पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. परिणामी व्यावसायिकांनी  दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले.

लहान व्यावसायिकांचे नुकसान
मागील वर्षी तसेच यावर्षीही कोरोनाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांसोबत लहान व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकजण चौकाचौकात रंग, पिचकारी तसेच अन्य साहित्य विकून संसाराला हातभार लावत होते. मात्र यावर्षीही त्यांचे नुकसान झाले असून अनेकांनी हा व्यवसायही बंद केला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीचे अनेक साहित्य यावर्षी विक्रीसाठी काढण्यात आले आहे.
 

 

Web Title: Due to the epidemic, the colors of Holi are still fading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.