धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:14 AM2017-12-21T00:14:12+5:302017-12-21T00:15:24+5:30

धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते.

Due to fanatic politics, the country's losses | धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

Next
ठळक मुद्देराम पुनियानी : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात व्याख्यान

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नव्या पिढीला धर्म आणि राजकारणातील मूलभूत भेद समजावून संविधानाच्या मूल्यांची जाणिव करून देणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.
मुस्लीम एज्युकेशन, सोशन अ‍ॅन्ड कल्चरल आॅर्गनायजेशनतर्फे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘मजहब सियासत और आज के हालात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देवून म्हणाले, कोणत्याही युगामध्ये धर्म आणि राजकारणाचा संबंध आला नाही. एक राजा दुसऱ्या राजाच्या साम्राज्यावर लढाई करण्यास जात होता. त्यावेळेला त्याचा उद्देश फक्त आपले साम्राज्य वाढविणे एवढाच होता. ही लढाई धर्माच्या नावावर नव्हती. अनेक मुसलमान राजांनी मुसलमान साम्राज्यावर आणि अनेक हिंदू राज्यांनी हिंदू साम्राज्यावर चढाई केल्याची उदाहरणे इतिहासाता आढळतात. अकबर बादशहाचे सेनापती हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लीम व्यक्ती महत्त्वाच्या पदावर होते.
परंतु, आजची परिस्थिती बदलली असून धर्म आणि राजकारणाला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आधारे देशातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यामुळे या घटनांना आळा घातला पाहिजे. युवापिढीला सत्य इतिहास सांगून जागृत करण्यासाठी विवेकी व विज्ञाननिष्ठ संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही पुनियानी यांनी व्याख्यानात नमूद केले.
दीड तासाच्या भाषणामध्ये पुनियानी भारतातील अनेक ऐतिहासिक उदाहरण देऊन राजकारण व धर्मकारणातील चुका पुढे मांडल्या. चर्चासत्राप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, बळीराज धोटे, अ‍ॅड. खान, प्राचार्य डॉ. जावेद खान, रोटरी क्लबच सदस्य, शैक्षणिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक मेस्कोचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद केले.डॉ. पुनियानी यांचा परिचय अ‍ॅड. फरहत बेग यांनी करून दिला.
काचवाला यांनी संचालन केले. हाजी वहीद खान यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एजाज शेख, हमीद लालानी, नाहीद हुसेन, जहीरभाई काजी, शब्बीर पठाण, रहेमान पटेल, रफीक मारफाणी, हाजी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.

Web Title: Due to fanatic politics, the country's losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.