पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:04 AM2018-08-19T00:04:58+5:302018-08-19T00:06:02+5:30

पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

Due to flooding hundreds of hectare crops on the crushing path | पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देपुराचा तडाखा : राजुरा, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस नष्ट झाला होता. यंदा पुराच्या पाण्यामुळे उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
राजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस पडला. वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्याच्या सहाय्याने पुराचे पाणी शेतात शिरले. मागील दोन दिवसांपासून शेकडो हेक्टर पीक पुराच्या पाण्याखाली आहे. यामध्ये सोयाबीन व कापसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीला लागून असलेल्या सर्वच नाल्यांना पूर आला . पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. गतवर्षी तालुक्यांमध्ये सुरूवातीला पावसाचे प्रमाण अल्प होते. पेरणी झाल्यानंतर पावसाने वेग धरला. मात्र पूर येईल, अशी स्थिती मागील वर्षी निर्माण झाली होती. यंदा वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली आहे. पूर ओसरण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती शेतकºयांनी दिली.
धान पिकाचेही नुकसान
राजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात कापूस, सोयाबी सोबतच भाताची शेती केली जाते. बहुतांश शेतकºयांची शेती नाल्याच्या काठावर आहे. पुराचे पाणी नाल्यात शिरून शेतात पसरले. याचा धान पिकालाही फटका बसला आहे.

Web Title: Due to flooding hundreds of hectare crops on the crushing path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.