मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:02 AM2019-07-29T10:02:58+5:302019-07-29T10:49:44+5:30

जिल्ह्यातील बल्लारपूर आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा पूल सोमवारी (दि.२९ ) सकाळी ६ च्या सुमारास वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

Due to heavy rains, the bridge in Chandrapur district was overflowing | मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पूल वाहून गेला

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पूल वाहून गेला

Next
ठळक मुद्देवाहतूक ठप्प

नीरज  चापले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर- जिल्ह्यातील बल्लारपूर आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा पूल सोमवारी (दि.२९ ) सकाळी ६ च्या सुमारास वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून तेथे दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी त्याला लागूनच एक उपरस्ता पाईप टाकून तयार केला होता. हा उपरस्ताच वाहून गेला आहे. या ठिकाणी शेकडो गाड्या खोळंबल्या असून प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. येथे काल रात्रीपासून जोरदार वृष्टी सुरू आहे.

Web Title: Due to heavy rains, the bridge in Chandrapur district was overflowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस