पालिकेच्या निष्क्रियतेमुळे २० घरकुलांवर अवैध ताबा

By Admin | Published: February 20, 2016 01:50 AM2016-02-20T01:50:33+5:302016-02-20T01:50:33+5:30

एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील ७७७ लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेल्या घरकुलात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ....

Due to inadequacy of the Municipal, illegal possession of 20 houses | पालिकेच्या निष्क्रियतेमुळे २० घरकुलांवर अवैध ताबा

पालिकेच्या निष्क्रियतेमुळे २० घरकुलांवर अवैध ताबा

googlenewsNext

तक्रार : जिल्हािधकाऱ्यांकडे न्यायाची मागणी
बी. यू. बोर्डेवार राजुरा
एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील ७७७ लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेल्या घरकुलात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी तक्रार पालिकेलीत शेतकरी संघटनेचे विरोधी पक्षनेते प्रा. अनिल ठाकूरवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजुरा नगर पालिकेतील मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांचे शहरातील घडामोडीवर मुळीच लक्ष नसणे ही अंत्यत गंभीर बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील हेमराज हांडे, शेख मकबुल,अनिस बेग मस्तान बेग यांच्यास २० लाभार्थ्यांना अजूनपर्यंत त्याच्या हक्काचे घरकुल मिळाले नाही. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांनीच घरकुलाचा ताब्या मिळविला असल्याचा गंभीर प्रकार घडला असतानाही राजुराचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ व त्यांचे कर्मचारी हा प्रकार खुल्या डोळ्यांनी पाहत आहे.
राजुरा शहरातील ७७७ घरकुलांची योजना ही गरीबांच्या उत्थानासाठी आहे. परंतु या घरकुल बांधकामाची पाहणी केली असता अनेक घरांना भेगा पडल्या असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी तर प्लॉस्टर झालेले नाही. अंत्यत दयनिय अवस्थेत घरकुलवासी जीवन कंठित आहेत. घरकुल वाटपात तर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. राजुरा शहरातील गरीब नागरिकांना घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधकामही झाले. परंतु जे खरे लाभार्थी आहेत, त्यांच्याऐवजी दुसरेच नागरिक या घरकुलात वास्तव्य करीत आहेत. मंजूर लाभार्थ्यांमध्ये राजाराम मामिडवार, आत्माराम नरुले, राजू राऊत, रामकिसन लवंदे, अशोक दापेवार, महंमद शेर महमंद, अब्दुल रहीम, अब्दुल रऊफ, अजिज खान, प्रदीप प्रजपती, छोटेलाल प्रजापती, नुरजहा हुसेन, पुष्पा मोरे, सुलताना सादीक, सैय्यद अकबरअली, निर्मला झोडगे, शेखजानी मकबुल यांचा समावेश आहे.

Web Title: Due to inadequacy of the Municipal, illegal possession of 20 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.